ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.!





























ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.!

--
“एखादी व्यक्ती जंगलात गेली व परत आल्यानंतर त्याने काहीच  दिसले नाही अशी तक्रार केली, तर ती व्यक्ती केवळ अंधच नाही तर बहिरी पण आहे, तिला गंध जाणवत नाही आणि ती निर्बुद्धही आहे” ... मी.

यात आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, तुम्ही वरील काहीही नसलात तरीही जंगल तुम्हाला थोडेसे लोभी सुद्धा बनवते; हा मुद्दादेखील पुढे समजावून सांगेन. तर हा लेख जंगलांविषयी व ताडोबाविषयीही आहे (कारण यावेळचा दौरा तिकडे होता) त्यामुळे ज्यांना आधीच उबग आल्यासारखा वाटत असेल, ते वाचन थांबवू शकतात (वैधानिक इशारा)! यंदाचा उन्हाळा आपण अनुभवलेला आत्तापर्यंतचा सर्वात भीषण उन्हाळा होता, धडाक्याने सुरू असलेली जंगलतोड, शहरीकरण व खाजगी वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांची कृपा, त्यातच आपल्या वातानुकूलन यंत्रांमधून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे थेट आपल्या पर्यावरणावर परिणाम होतो, तरीही हे न स्वीकारण्याइतपत किंवा त्याची दखल न घेण्याइतपत आपण मूर्ख आहोत व त्याची किंमत प्रत्येक सजीवाला मोजावी लागतेय. ताडोबा आधीच उन्हाळ्यातील भीषण उष्णतेसाठी ओळखले जाते, तर चंद्रपूर व त्याच्या आजूबाजूची ब्रह्मपुरीसारखी गावे जगाच्या नकाशावर सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखली जातात, या उन्हाळ्यात एप्रिलमध्येच पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. मी त्यादिवशी नागपूरवरून ताडोबाच्या कोलारा (चिमूरच्या बाजूने) प्रवेशद्वाराकडे जात होतो, तेव्हा नागपूर व चंद्रपूर दोन्हींचे तापमान ४५ अंशांच्या वर होते. मी जेव्हा स्थानिक वर्तमानपत्र खरेदी केले, त्या दिवशी त्यातील मथळा होता की आज चंद्रपूर हे जगातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे (म्हणजे आदल्या दिवशीचे तापमान)! मी खरोखरच सांगतो उष्णतेमुळे तुम्हाला सकाळी आठ वाजताच गरगरल्यासारखे वाटू लागते, अर्थात एक गोष्ट चांगली आहे की जंगलामध्ये ऑक्सिजनची पातळी बरीच जास्त असते व त्यामुळे बरीच मदत होते कारण इतर वायूंच्या तुलनेत ऑक्सिजन हा थंड वायू असतो. घड्याळाचा काटा पुढे सरकत जातो तशी उष्णताही वाढत जाते व जंगलातील सर्व हालचाल पाण्याभोवती होऊ लागते, ज्याचेही दुर्भिक्ष्य ताडोबाच्या काही विभागांमध्ये जाणवू लागले आहे. वाघ कच्चे मांस खात असल्यामुळे शरीरामध्ये अतिशय जास्त उष्णता निर्माण होते, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी पाण्याची गरज असते. पक्षी तसेच जंगलातील इतर सजीवांनाही पाण्याची गरज असते व त्यामुळेच पाणवठ्यांना अचानक सर्वाधिक मागणी असते. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जंगलात असता तेव्हा तुम्हाला जंगलाचा राजा किंवा राणी (वाघ) दिसतो तेव्हा त्या उत्साहात तुम्हाला हवामान कितीही त्रासदायक असले तरीही त्याचा विसर पडतो अशी या काळ्या-पिवळ्या पट्ट्यांची जादू आहे व मीसुद्धा वन्यजीवनाच्या या नियमाला अपवाद नाही.

वन्यजीवनाविषयीच्या (म्हणजे ताडोबाविषयीच्या) या लेखाचे कारण उन व उष्णता हे नाही तर जंगलातून परत येताना मला काय गवसले हे आहे. 

तिथे सर्वप्रथम आवश्यक असतो तो संयम तसेच, खडतर हवामान सहन करणे व थोडाफार त्रास झाला तरी त्यातही जगायला शिकणे गरजेचे असते. कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने (म्हणजे त्याद्वारे नियंत्रित केले जात असलेले) सुरू असलेल्या आपल्या आयुष्यात आपल्याला क्वचितच काही त्रास सहन करावा लागतो, जर उन्हाळ्यामध्ये उकाडा जाणवत असेल तर आपले घर थंड ठेवण्यासाठी वातानुकूलन यंत्र असते, हिवाळ्यामध्ये आपल्याकडे हीटर असतात व वॉर्मर असतात जेणेकरून आपण उबदार राहू शकतो, थंडी असते तेव्हा आपले अन्न गरम करण्यासाठी आपल्याकडे मायक्रोवेव्ह असतो. जेव्हा आपल्याला आपला बासुंदी सारखा पदार्थ थंडगार करून खायचा असतो तेव्हा आपल्या दिमतीला फ्रिज असतो, काँक्रिटच्या जंगलातील आपल्या या सुखाच्या आयुष्याला आपण इतकं सरावलो असतो की कोणत्याही अडीअडचणीमध्ये जुळवून घेणे आपल्याला कठीण जाते. नेमक्या याच कारणामुळे मी जंगलात जातो कारण पहाटे 4 वाजता उठण्यापासून रात्री 9 च्या आत झोपण्याची शिस्त स्वतःला लावून घेणे, हलका आहार घेणे व कारमध्ये कोणताही सीटबेल्ट किंवा एससी नसताना ओबडधाबड रस्त्यावर प्रवासासाठी सज्ज होणे, टोकाचे हवामान सहन करणे, जंगल मला भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला शिकवते, वातावरणाला आपल्या आरामासाठी आपल्याशी जुळवून घ्यायला लावत नाही. एप्रिल अखेरीच्या उन्हाळ्यातही, ताडोबासारख्या जंगलातली सकाळची झुळुक तुम्हाला पहिले अर्धा तास कुडकुडायला लावते, परंतु १० वाजेपर्यंत जसा सूर्य डोक्यावर येऊ लागतो, तुम्ही जिप्सीचा लोखंडी दांडा पकडू शकत नाही एवढा तापमानामध्ये होणारा फरक तीव्र असतो. हो, लाल मातीतून उडणाऱ्या धुराळ्याचा उल्लेख करायचाच विसरलो, जो हवेत पसरलेला असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या संवेदनशील नाकपुड्यांचे नेहमी संरक्षण करण्यासाठी तुमच्या नाकावर मास्क लावू ठेवावा लागतो. आता विचार करा, आपल्याकडे सर्वकाही संरक्षण असूनही आपल्याला या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल तर वाघ व अस्वलासारख्या प्राण्यांना काय वाटत असेल व ताडोबातला उन्हाळा ते कसे हाताळत असतील!

इथे केवळ वाघच नव्हे तर अस्वलाचे दिसणे किंवा वन्यजीवनातील असे सर्व क्षण तुम्हाला होत असलेल्या सगळ्या त्रासाचा विसर पाडतात, हे एकप्रकारे झेन सारखे ध्यान करण्यासारखेच आहे, कारण तुम्ही भर उन्हात वाट पाहात असता तर वाघ जवळपास कुठेतरी बांबूच्या वनात सावलीमध्ये किंवा पाण्याच्या डबक्यात पहुडलेला असतो, तुम्ही त्याला पाहू शकत नाही, परंतु तो तिथे आहे याची तुम्हाला जाणीव असते व तुम्ही वाटत पाहात राहता. तुमच्या जिप्सीला एखाद्या झाडाचा आडोसा मिळाला तर तुमचे नशीब, नाहीतर उन्हाच्या झळा सोसा व तुम्हाला शक्य तितके पाणी प्या (यातही अडचण असते कारण बाथरूमसाठी जायला प्रसाधनगृह लांब असते ही वन्यपर्यटनाची आणखी एक अडचण आहे) हा एकमेव पर्याय असतो, परंतु जेव्हा तुम्ही पाणवठ्यापाशी वाघ येताना पाहता (जेव्हा त्याला वाटते तेव्हाच तो येतो) तेव्हा हे सगळे सार्थकी लागते. तुम्ही उष्णतेचा तो तडाखा सहन केला त्याविषयी सगळे काही विसरता व तुम्ही केवळ त्या राजेशाही प्राण्याकडे व त्याच्याभोवती असलेल्या वलयाकडे पाहात राहता. अचानक तुम्हाला असह्य उकाडा, घाम, घशाला पडलेली कोरड काहीच जाणवत नाही, कशाचेच फरक पडत नाही, एक उत्साह संचारतो, वाघाच्या केवळ दिसण्याची, त्या क्षणाची ही ताकद आहे, जंगलातून परत जाताना मी हा अनुभव सोबत घेऊन जातो. त्यानंतर कोणत्याही पाणवठ्यावर वाघाची वाट पाहण्यात गंमत असते कारण सुरुवातीला जर तुम्हाला पाणवठ्यावर वर्षाच्या या काळात हरिण किंवा माकडे दिसली नाहीत तर वाघ जवळपासच कुठे विश्रांती घेत असला पाहिजे याची खात्री बाळगा, तुम्हाला तो दिसत नाही परंतु वाघाने तुम्हाला नक्की पाहिलेले असते व आता तुम्ही केवळ धीर धरणे आवश्यक असते. परंतु जर वाघ पाणवठ्यावर नसेल तर तुम्ही पाणवठ्यावर आपली तहान भागवण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांना पाहण्याचा आनंद घेऊ शकता व त्यांचे वर्तन अभ्यासू शकता. अनेकदा जर वाघ कुठेतरी दाट जंगलामध्ये झोपला असेल व रात्रीच तेथे येऊन बसला असेल तर हरिण, माकड किंवा रानगव्यासारख्या प्राण्यांच्या तो नजरेस पडत नाही व ते थोडेसे निर्धास्त असतात. पण जेव्हा त्यांना वाघ जवळपास आहे हे माहिती असते तेव्हा ते कशाप्रकारे खबरदारी घेतात हे निरीक्षण करण्यासारखे असते!

पाणवठ्यावर वाट पाहताना तुम्ही पक्ष्यांची छायाचित्रे काढू शकता कारण ते वाघाला घाबरत नाहीत व त्यांची दुपारची वेळ जेवणाची तसेच पाणी पिण्याची असते. स्वर्गीय-नर्तक, सुतार पक्ष्यापासून ते रानकोंबड्यापर्यंत अनेक पक्ष्यांची छायाचित्रे काढणे एरवी अवघड असते, परंतु तुम्ही स्थिर उभे असता व छायाचित्रेही काढऊ शकता. मी काही एक चांगला पक्षी छायाचित्रकार नाही, त्यामुळे अशावेळीही मला या पक्ष्यांची फार चांगली छायाचित्रे काढता आलेली नाही, तरीही माझ्या मनात त्यांची जी छायाचित्रे टिपली गेली आहे ती मी जंगलातून परत घेऊन जातो. सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, तुम्हाला जेव्हा वाघ पाणवठ्याजवळ झोपलेला दिसत नाही परंतु रानगवा किंवा अस्वल यासारखे मोठे प्राणी किंवा अगदी जंगली कुत्र्यांची झुंड वाघ जिथे विश्रांती घेत आहे त्याच मार्गाने येते तेव्हा दोन गोष्टी होऊ शकतात, एकतरत वाघ आणखी दाट जंगलात निघून जातो (तुमचे दुर्दैव) किंवा तो त्या प्राण्याला हुसकून पुन्हा पाणवठ्यापाशी येतो व अशावेळी होणारी झटापट ही पाहण्यासारखी असते. या दौऱ्यामध्ये मी जे काही वाघ पाहिले ते पाणवठ्याजवळच पाहिले व अगदी लाजाळू वाघालाही पाणवठ्याला भेट द्यावीच लागते, बेला नावाची अशीच एक वाघीण केवळ उकाडा असल्यामुळेच आम्हाला पाहता आली! किंबहुना, वनविभागाने सर्व महत्त्वाच्या पाणवठ्यांपाशी काही अंतरावर प्रसाधनगृहे उभारली पाहिजेत (जी स्वच्छ असावीत याची कृपया नोंद घ्यावी), म्हणजे पर्यटक केवळ वाघच नव्हे तर सर्व वन्यजीवन पाहता यावे यासाठी संयमाने वाट पाहतील, कारण त्यांना प्रसाधनगृहाच्या शोधात लांब जावे लागणार नाही. त्यानंतर बहुतेक पर्यटकांनी वन्यजीवनाचे समृद्ध वैविध्य पाहिलेलेच नसते ते सर्व प्रजाती निवांतपणे पाहू शकतील, तसेच गाईडही केवळ वाघांच्या मागे पळण्याऐवजी जंगलातील अशा सर्व प्रजातींचे महत्त्व समजून सांगण्यासाठी वेळ काढू शकतात. असे होण्याचे कारण म्हणजे केवळ वाघांनाच आपले वन्यजीवन म्हणून प्रसिद्धी दिली जाते, केवळ योग्य पावले उचलून हा दृष्टिकोन बदलता येऊ शकतो व पर्यटकांना पाणवठ्यापाशी वेळ घालावायला लावणे हा नक्कीच असा एक मार्ग आहे!

उन्हाळा हा अस्वल पाहण्याचा सर्वोत्तम ऋतू असतो कारण असह्य उकाड्यामुळे ते उघड्यावर पाण्यापाशी येतात व तुम्हाला तडोबामध्ये उन्हाळ्यात दुपारच्या वेळी काही दिसतील. अस्वले ही जंगलातील अतिशय रोचक प्राणी असतात, एकेकाळी ती भारतामध्ये सर्वत्र आढळत, माझ्या विदर्भातील लहानशा गावाभोवती सुद्धा अस्वल दिसायचे हे मला आठवतेय. झपाट्याने होत असलेले शहरीकरण व त्यांचा अधिवास नष्ट होत असल्यामुळे आता अस्वलांनी जंगलांच्या उरलेल्या पट्ट्यांमध्ये आसरा घ्यायला सुरुवात केली आहे व ताडोबाचे बफर क्षेत्र त्यांच्या अतिसुरक्षित घरांपैकी एक आहे. तरीही त्यांचे दिसणे वाघापेक्षा दुर्मिळ असते जे अनेक पर्यटकांना माहिती नसते व ते अशा प्राण्यांकडे दुर्लक्ष करतात. अस्वले ही निशाचर प्राणी असतात व सामान्यपणे रात्री बाहेर पडतात, तरीही उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यांना दिवसाच्या प्रकाशातही पाहू शकता कारण ते वाळवीच्या (खाण्याच्या) शोधात निघालेले असतात. ते अतिशय लाजरे असले तरीही अगदी सहजपणे चिडतात त्यामुळे स्थानिक लोकांना वाघापेक्षाही अस्वलाला सामोरे जाण्याची भीती वाटते, कारण त्यांचे पुढचे पाऊल काय असेल हे तुम्ही गृहित धरू शकत नाही व त्यांच्या पंजाची धारदार नखे मानवी त्वचा क्षणार्धात फाडू शकतात. तुमच्या दिशेने येत असलेले अस्वल अचानक उलटे फिरू शकते व निघून जाऊ शकते किंवा याच्या उलटही होऊ शकते, यामुळे त्याची छायाचित्रे काढणे अतिशय अवघड वाटू शकते. तरीही या दौऱ्यात मला एक आई व तिच्या पिल्लाचे अगदी स्पष्ट छायाचित्र काढता आले. उन्हाळ्यातील एका उष्ण दुपारी आमच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याने आईने तिची धारदार नखे असलेला पंजा दुर राहण्याचा इशार म्हणून आमच्यावर उगारला, जे आम्ही आनंदाने मान्य केले.

आम्ही ताडोबा बफर क्षेत्राचे उप संचालक, वनअधिकारी श्री. कुशाग्र पाठक, आयएफएस, मदनापूर प्रवेशद्वाराचे एसीएफ परिक्षेत्र अधिकारी श्री. एसएस दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर व वणव्यांवर लक्ष ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शूज दान करण्याची मोहीमही राबवली. वनविभागाकडून श्री. खवसे तर जंगल बेल्समधून हेमांगी वर्तक यांनी यासाठी समन्वय साधला, इंडस शाळेतील मुलांनी ही मोहीम सुरू केली होती. 

मित्रहो, जंगले आपल्याला कितीतरी आनंददायक क्षण देतात व त्यांच्या सुंदर आठवण आपण आपल्या काँक्रिटच्या जंगलात परत घेऊन जातो, म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जे काही जमेल ते जंगलांना देत राहणे आवश्यक आहे, हे आवाहन करून निरोप घेतो!
-
you can watch more tadoba magic at link below...

https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720325654279

संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in


















 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्याच्या टेकड्या!!

उन्हाच्या झळा आणि घराची काळजी.