पोस्ट्स

ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.!

इमेज
ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.! -- “एखादी व्यक्ती जंगलात गेली व परत आल्यानंतर त्याने काहीच  दिसले नाही अशी तक्रार केली, तर ती व्यक्ती केवळ अंधच नाही तर बहिरी पण आहे, तिला गंध जाणवत नाही आणि ती निर्बुद्धही आहे” ... मी. यात आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, तुम्ही वरील काहीही नसलात तरीही जंगल तुम्हाला थोडेसे लोभी सुद्धा बनवते; हा मुद्दादेखील पुढे समजावून सांगेन. तर हा लेख जंगलांविषयी व ताडोबाविषयीही आहे (कारण यावेळचा दौरा तिकडे होता) त्यामुळे ज्यांना आधीच उबग आल्यासारखा वाटत असेल, ते वाचन थांबवू शकतात (वैधानिक इशारा)! यंदाचा उन्हाळा आपण अनुभवलेला आत्तापर्यंतचा सर्वात भीषण उन्हाळा होता, धडाक्याने सुरू असलेली जंगलतोड, शहरीकरण व खाजगी वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांची कृपा, त्यातच आपल्या वातानुकूलन यंत्रांमधून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे थेट आपल्या पर्यावरणावर परिणाम होतो, तरीही हे न स्वीकारण्याइतपत किंवा त्याची दखल न घेण्याइतपत आपण मूर्ख आहोत व त्याची किंमत प्रत्येक सजीवाला मोजावी लागतेय. ताडोबा आधीच उन्हाळ्यातील भीषण उष्णतेसाठी ओळखले जाते, तर चंद्रपूर व त्याच्या आजूबाजूची ब्रह्मपुरीसारखी ग...

उन्हाच्या झळा आणि घराची काळजी.

इमेज
उन्हाच्या  झळा आणि घराची काळजी..! “हिवाळ्यातली थंडी अनुभवल्याशिवाय उन्हाळ्यातल्या उबेचे महत्त्व, तिच्यातला गोडवा कसा जाणवणार.” ― जॉन स्टेनबेक. “उन्हाळ्यामध्ये कीटकांचे साम्राज्य जास्त पसरते.” ― ॲडम झॅगावेस्की. “उन्हाळा हा नेहमीच अतिशय वाईट ऋतू असतो. प्रत्येकचजण नेहमी हिवाळ्याविषयी तक्रार करतो, पण हिवाळ्यामध्ये सगळे काही अगदी सोपे होते, तुम्ही फक्त केवळ बाहेर पडत नाही. उन्हाळा मात्र नेहमी जेथे त्याची गरज नसते तिथे डोकावतो.” ― कॅथरीना व्हर्मेट. “विचार करा एक खोली आहे  जिला सहा भिंती आहेत व एक छप्पर आहे दोन मोठ्या खिडक्या आहेत दोन मोठे आरसे आहेत दोन फिकट पांढऱ्या रंगाच्या भिंती आहेत ज्या सूर्यप्रकाशाने रंगवण्यात आल्या असाव्यात असा गैरसमज सहज होऊ शकतो. प्रत्येक सकाळी, धगधगता सूर्य खोलीमध्ये प्रवेश करतो  व प्रत्येक कोपऱ्याला तो अगदी ओसंडून वाहेपर्यंत भरून टाकतो - खिडक्या सूर्यप्रकाशाची देवाण-घेवाण करतात  (यातून सुटका व्हावी किंवा थोडा आराम मिळावा यासाठी एखादा दरवाजाही नसतो). आरसे झगमगतात व डोळे दिपून जातात  सर्व भिंती स्वतःच्याच आगीत पेटून उठलेल्या असतात. त्या गुदमरव...

पुण्याच्या टेकड्या!!

इमेज
                                                              पुण्याच्या टेकड्या!! “आपण जैवविविधतेच्या या संपूर्ण श्रेणीची काळजी घेतली पाहिजे – ज्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो – केवळ पर्यावरणीय गुणांकनामध्ये एका किंवा दोन गुणांची नव्हे.” … डेव्हिड अटेनबरो.   सर डेव्हिड फ्रेडरिक अटेनबरो हे इंग्लिश वृत्त प्रक्षेपक, जैवशास्त्रज्ञ, नैसर्गिक इतिहासतज्ज्ञ, व लेखक आहेत. ते बीबीसी व ॲनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवरील लाईफ प्लॅनेट या त्यांच्या माहितीपटांच्या मालिकेसाठी लेखन व सादरीकरणासाठी सर्वाधिक ओळखले जातात, यामध्ये पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या जीवनाचे अतिशय सर्वसमावेश सर्वेक्षण करण्यात आले होते, खरेतर हे एकच काम सर डेव्हिड यांची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहे. तुम्ही यापैकी काहीच पाहिले नसेल तर कृपया गूगल करा व ते आवर्जून पाहा म्हणजे तुम्हाला त्यांच्या वरील शब्दांमधील प्रामाणिकपणा जाणवेल. मी निसर्ग व वन्यजीवनासाठी काम करणारी अन...